तो पुन्हा कधीच भेटणार नाही
तो पुन्हा कधीच भेटणार नाही
1 min
423
आता त्या फोनवर पुन्हा तो भेटणार नाही.
पुन्हा त्याचा आवाज कानी कधीच पडणार नाही.
अश्रू आहेत न थरणारे मुद्दाम त्यांना रोक्ल नाही.
आठवणींच्या मालिकेतील त्याची जागा कोणी घेणार नाही.
अस्तित्वाची जाणीव त्याची कधीच मनाने सोडली नाही.
त्याने ही शेवट पर्यंत जगण्याची आस सोडली नाही.
काळजीने सगळ्यांच्या तो कधीच शांत बसला नाही.
खुप त्रास झाला तरी श्वासांचा लढा सहज त्याने सोडला नाही.
प्रयत्न करुनही खुप तो आयुष्याच्या युध्दात जिंकला नाही.
आज शांत निजला तो पुन्हा कधीच भेटणार नाही.
