काय करून गेला कोरोना ?
काय करून गेला कोरोना ?
एक आजारपणाचे विषाणू अख्खं जग बदलून गेल.
संशोधनावर या विषाणूला "कोरोना" नाव दिलं गेल.
गेल्या काही दिवसात बरेच काही शिकवून गेल.
गेल नाही म्हणून अख्खं विश्व घाबरून गेल.
पृथ्वी वरच्या प्रत्येक श्वासाची नोंद घेऊन गेल.
प्रत्येक देशात परिणाम म्हणून नाहक बळी घेऊन गेल.
लोकांच्या मनात स्वतःचीच भीती दडवून गेल.
माणसाला माणसांच्या गर्दीतून दूर पळवुन गेल.
प्रत्येकाच्या आयुष्याच अवघड कोड मांडून गेल.
येणारा क्षण धोक्याचा अशी माहिती सांगून गेल.
चांगल्या वाईट सवईंची शिकवण देऊन गेल.
भारतीय संस्कृतीची उजळण सर्वत्व करून गेल.
सोवळ आणि स्वछतेचे धडे देऊन गेल.
संसर्गजन्य रोग म्हणून ओळख पटवून गेल.
आता तर करोना खरच नकोस करून गेल.
जवळच्या लोकांना गमवायचं दूःख देऊन गेल.
जगातील जन समूहाला खूप रडवून गेल.
सर्व जगाचा आर्थिक व्यवहार ठप्प करून गेल.
प्रत्येकाला घरात राहण्याचे फायदे दाखवून गेल.
जनता कर्फ्यू पाळण्याच आवाहन करून गेल.
