STORYMIRROR

Shraddha Chavan Kale

Others

3  

Shraddha Chavan Kale

Others

परिपूर्ण स्त्री

परिपूर्ण स्त्री

1 min
283

आयुष्याचा वाटेवर अचानक एक दगड आला,

ठेच लागूनी पायाला देह तिचा कोसळून पडला.

ज्यावर होता विश्वास खुप तोच टाळून निघून गेला,

अश्रू आले अलगतावादी पापण्यांतुन सडा गेला.

आजवर त्यांनी जे काही होतं जपलेल,

सार क्षणात होत तेथे पसरलेल.

प्रेमळ त्या संसाराचा पाया पार खचुन गेला,

आनंदाचा प्रत्येक क्षण हळूच हात सोडून गेला.

हलकेच मग दुरवर एक आस दिसु लागली,

काही न बोलता मायेची उब तिझ भासू लागली.

आईच्या हाकेला ती स्वतः सावरत उभी राहिली. 

स्वतःला घडवण्याची आस मनी तिच्या जागली.

संसार सुखाचा सावरता स्वताला होती ती वसरून गेली,

आज मागे वळून बघता दिसली तीला तीचीच छवी वेगळी.

अश्रू पुसून चेहर्यावरी एकाकी स्वतःला बघु लागली,

"कोण होते मी आणि काय झाले" याच उत्तर शोधु लागली.

वेळ आली होती स्वतःच अस्तित्व निर्माण करायची,

विश्वात स्वतंत्र अशी एक *परिपूर्ण स्त्री* घडवण्याची.


Rate this content
Log in