माहेर
माहेर
माहेर माहेर म्हणजे अस्त तरी काय ?
लेकी साठी तीथे आहे तरी काय?
कोण म्हणे माहेरी आराम आहे खुप,
कोण म्हणतं माहेरून आली खाउन तुप.
कोण म्हणतं माहेर म्हणजे ऊन्हाची सावली,
कोण म्हणतं माहेर म्हणजे आई वडील माउली.
माहेरी येते मुलगी पाहुणी बनून,
चार दिवस राहुन मग जाते परतून.
माहेरी ती येत नाही आरामाला,
येते ती फक्त मनाच्या आधाराला.
माहेर आहे तीच्या अस्तित्वाची जाणीव,
भासत अस्ते सतत तीला त्याची उणीव.
माहेरी अस्तो तीच्या आठवणींचा साठा,
काही केल्या तीला सोडता येत नाही त्या वाटा.
माहेर माहेर म्हणजे अस्त तरी काय?
माहेरच प्रेम म्हणजे दुधा वरची साय..
आहेत अश्याही काही ज्यांना माहेरच् नाही,
आई वडील असूनही त्यांच अस्तित्वच नाही.
झाल्या परक्या लेकी त्या
त्यांना आधारच नाही,
कुठे रडायचं त्यांनी ज्यांना माहेरच नाही...
