STORYMIRROR

Sanjay Gurav

Others

3  

Sanjay Gurav

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
25

कुणाकुणाला ओढ पावसाची

मनामनाला ओढ पावसाची


तनाला आवडते खोड पावसाची

चपळ दामिनीला जोड पावसाची


पहिली भेट व्हावी गोड पावसाची

कशालाच नाही या तोड पावसाची


वाराही वेेडावे मिळता जोड पावसाची

सोसावीच लागते मग झोड पावसाची


कळत नाही कधीकधी या तेढ पावसाची

जीवाला इथल्या तरीही... "ओढ पावसाची"


Rate this content
Log in