STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
11

ओढ असते अंतरीची

कधी जन्म जन्मांतरीची

मनीच्या भाव भावनांची...१


ओढ असते पावसाची

नखशिखांत भिजण्याची

त्या ओल्या चिंब दिवसांची....२


ओढ काळ्या मेघमालांची

बेधुंद बेभान वाऱ्याची

त्या चमकणाऱ्या रेघांची....३


ओढ वळीव पर्जन्याची

गडगडणाऱ्या ढगांची

कोसळणाऱ्या त्या सरींची....४


ओढ फेसाळी प्रपाताची

आभाळ फुटल्या पान्ह्याची

त्या रिमझिम पावसाची....५


ओढ नाचणाऱ्या मोराची

छपरावर पागोळ्याची

टपटपणाऱ्या मोत्यांची....६


ओढ रानात गारव्याची       

त्याच्या उबदार मायेची

अंकुरल्या बिजवाईची....७


ओढ मावळत्या सांजेची

मातीच्या प्रेमळ कुशीची

भरवल्या दोन घासांची....८


Rate this content
Log in