Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

1 min
11.7K

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

नवी आव्हाने मनुजाला

प्रगती, विकास साधूनही

अचानक खीळ कशी त्याला ?

नवनवीन शोध मानव लावी

अंतराळातही झेप घेई

तरीही छोट्या विषाणूनी

का बरे तो हतबल होई ?

मानव श्रेष्ठ की निसर्ग ?

गर्व जाहला मनुजाला

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

निसर्गाने धडा शिकविला

कितीही गमजा केल्या तरीही

त्सुनामी , वादळे , पूर येता

निसर्गापुढे मिळे ना त्यासी

स्वसंरक्षणार्थ उपाययोजना 

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

धडा शिकावा मानवाने

निसर्गाशी मिळतेजुळते

नेहमीच घ्यावे विनयाने

Rate this content
Log in