नव्या युगाचा सूर्य
नव्या युगाचा सूर्य
1 min
50
गतकाळाची पाने उलटून
अनिष्ट प्रथा उखडून टाकू
नवक्षितिजावर आव्हानात्मक
आयुष्याचे पाणी चाखू.......||१||
उगवला नव्या युगाचा सूर्य
उत्कर्ष हा नवचैतन्याचा
ज्ञानोपासक भारत घडवू
आशावादी नवं प्रकाशाचा........||२||
नव्या दमाचा तेजवर्धक
नवतरूणांचा भाग्यविधाता
सृष्टीचा तू पालनकर्ता
सोनपिवळ्या किरणांचा दाता.....||३||
नव पिढीला देत दिलासा
उगवला नव युगाचा सूर्य
मानवा, झटकून सारी मरगळ
जागव आता तुझा कर्मसूर्य.....||४||