STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

नव्या दिवसाचे येणे

नव्या दिवसाचे येणे

1 min
27.1K


नवा दिवस नवचैतन्याचा पुढ्यात यावा

आज्ञा कर तू, हात जोडूनि तुला म्हणावा


घास सुखाचा, आनंदाचा तुला भरवतो

जीवनात तव सहल सुखाची नित्य घडवतो


सदाफुलीसम प्रसन्नतेने फुलत रहा तू

चंद्रकलेसम कलेकलेने खुलत रहा तू


दिशा दहाही तव किर्तीने गरजत राहो

सदा सुखाची वर्षा तुजवर बरसत राहो


लाभावी तुज शतवर्षांची आयु सखे गं

उधळत राहो कीर्ती सुगंध वायु सखे गं


नावा समान स्नेह सखे हा वाढत राहो

जन्मोजन्मी संग तुझा मज लाभत राह


Rate this content
Log in