नववधू
नववधू
1 min
123
नववधू तू , नवी नवरी
लाजून झालीस बावरी
हळद अंगाला लागली
तू जाणार उद्याच सासरी
घर आज गजबजलेले
गप्पागोष्टींनी खुललेले
उद्या जाशील तू सासरी
मन आज गलबललेले
स्वर्ग सात पावलांवरी
सख्यासवे रहा मजेत
करा सुखाने संसार
इच्छा ही मम अंतरात
सय येईल नित्य बाळीची
ही चालरीत दुनियेची
पडेल ती अंगवळणी
आज सर दाटे अश्रूंची
