नवरात्र
नवरात्र
नवदिवसाचा मान ग।
सजता सजली उभी मंडपी
नवं रसाची माळ ग।।धृ।।
नवरात्रिच्या पहिल्या माळेला
शिखरावरती सुर्य उगवला
पिवळा सारा गांव ग।
पहिल्या हारिला नमन तुजला
माता शैलपुत्रिचे नांव ग।
सजता सजली उभी गव्हाळी
पिवळ्या रंगाची माळ ग।।१।।
नवरात्रिच्या दुसऱ्या माळेला
अनंताचा देव उगवला
हिरवा सारा गांव ग।
दुसऱ्या हारिला नमन तुजला
माता ब्रम्ह चारिणीचे नांव ग।
सजता सजली उभी गव्हाळी
हिरव्या रंगाची माळ ग।।२।।
नवरात्रिच्या तिसऱ्या माळेला
घंटानांदी सुर्य उगवला
राखाडी सारा गांव ग।
तिसऱ्या हारिला नमन तुजला
माता चंन्द्रघंटेचा नाद ग।
सजता सजली उभी गव्हाळी
राखाडी रंगाची माळ ग।।३।।
नवरात्रिच्या चौथ्या माळेला
ब्रम्हांडी उर्जा स्त्रोत उगवला
केसरी सारा गांव ग।
चौथ्या हारिला नमन तुजला
माता कूष्माण्डाचे नांव ग।
सजता सजली उभी गव्हाळी
केसरी रंगाची माळ ग।।४।।
नवरात्रिच्या पाचव्या माळेला
दैविय शक्ती गोळा उगवला
शुभ्र सारा गांव ग।
पाचव्या हारिला नमन तुजला
स्कंद मातेचा गजर ग।
सजता सजली उभी गव्हाळी
शुभ्र रंगाची माळ ग।।५।।
नवरात्रिच्या सहाव्या माळेला
सकारात्मक तेचा सूर्य उगवला
लाल सारा गांव ग।
सहाव्या हारिला नमन तुजला
माता कात्सायनीचे नांव ग।
सजता सजली उभी गव्हाळी
लाल रंगाची माळ ग।।६।।
नवरात्रिच्या सातव्या माळेला
अंधारावर उजीड सांडला
निळा सारा गांव ग।
सातव्या हारिला नमन तुजला
माता काळरात्रिचे नांव ग।
सजता सजली उभी गव्हाळी
निळ्या रंगाची माळ ग।।७।।
नवरात्रिचे आठव्या माळेला
मनोकामनी देव प्रगटला
गुलाबी सारा गांव ग।
आठव्या हारिला नमन तुजला
माता महागौरीचे नांव ग।
सजता सजली उभी गव्हाळी
गुलाबी रंगाची माळ ग।।८।।
नवरात्रिच्या नवव्या माळेला
परिपुर्णतेचा सुर्य उगवला
मोरपंखी सारा गांव ग ।
नवव्या हारिला नमन तुजला
माता सिद्धि-दात्रीचे नावं ग
सजता सजली उभी गव्हाळी
मोरपंखी रंगली माळ ग।।९।।
