STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

4  

Yogita Takatrao

Others

नवदुर्गा

नवदुर्गा

1 min
512

शैलपुत्री,ब्रह्मचारिणी

चंद्रघंटा,कूष्मांण्डा

नाही तुजविण शुर

कोणी ह्या ब्रम्हांडा


स्कंदमाता,कात्यायनी

कालरात्रि,महागौरी

तुझिच ही नवरूपे

भासे लहर न्यारी


सिध्दिदात्री तू जगदंबा

दुःखहारिणी माता

घालते लोटांगण

तूच सर्वस्व आता


आधार दे माते

तूज भक्तगणां

आशिष देऊनी

बळ दे दुबळ्यांना


घट बसले भक्तीचे 

जणू तव रूप माता

पाठिराखी नवदुर्गे

तूच शक्ती दाता 


उच्छाद पहा कैसा

दैत्य मांडती भूवरी 

काली बनून ये माते

संहारक बन सत्वरी


अखंड दीप तेवतो

रात्रंदिन तुजसाठी 

भक्तीभाव उचंबळे

नवरात्र पवित्र मोठी 



Rate this content
Log in