STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

नटली वसुंधरा

नटली वसुंधरा

1 min
383

हिरवा हिरवागार नेसली शालू ही वसुंधरा

नयनमनोहर दृश्य येथले आनंदाचा झरा


हिरवी झाडे वेली रंगीत फुले किती फुलली

सोळा शृंगार लेऊन जणू ही नववधू सजली


भिडला डोंगर जणू नभाला पाणी मागाया

धावत येतसे सरिता पाणी पृथ्वीला द्याया


नदी किनारी जमीन कसाया वस्तीही झाली

अर्धगोल आलिंगन द्याया नदी पुन्हा फिरली


शहरी जणांना भुरळ घातली या सौंदर्याने

उंच इमारती किती उभ्या राहिल्यात डौलाने


विज्ञानाची कास धरूनच केली जाते शेती

उभे विजेचे खांब येथले साक्ष तयाची देती


विशाल शीला इथे थांबल्या घट्ट पाय रोवुनी

कपडे काढून विसावती येथे पांथस्थ कुणी


कुण्या कलाकाराने सजवली नयनरम्य सृष्टी

साशंक वाटे येथे छाया चित्रकाराची ही दृष्टी


Rate this content
Log in