नोकरी
नोकरी
1 min
286
नोकरी मिळणे वेळच्यावेळी
नशिबाचे असते काम
शिक्षण संपताच माझी
झाली नोकरीस सुरुवात
नवीन वातावरणी येता
मनी बावरुन गेले
ओळखीच्या मैत्रीणी नव्हत्या
सर्व अनोळखीच वाटले
हळूहळू कामे शिकता शिकता
कामात रस वाटू लागला
रोजी रोटी ही नोकरी
थोडा जम बसू लागला
हळूहळू मैत्रीणी मिळाल्या
सहकारीही झाले परिचयाचे
हे नवे आँफिस दालन नंतर
सहजच होऊन गेले नित्याचे
