नको नको रे पावसा.
नको नको रे पावसा.

1 min

112
नको नको रे पावसा असा झिम्माड येऊ.
नको नको माझ्याकडे असा रागाने पाहू!
का रे आला स पावसा शाळा सुटण्याच्या वेळी.
घरी राहिली चुकून नवी कोरी छत्री काळी.
माझे भिजले दप्तर, त्याचे ओझे कसे नेऊ?
पाणी पाणी चोहीकडे झाले सारे ओले चिंब.
दूर गावाच्या टोकाला घर माझे फार लांब.
छत्री तून मित्राच्या रे, पुढे गेला मोठा भाऊ.
पाटीवरचा अभ्यास तूच टाकला पुसून
वाट पाहत असेल आई दारात बसून.
खाऊ केलेला आईने केव्हा घरी जाऊन मी खाऊ?