नकळत सारे घडून गेले
नकळत सारे घडून गेले
1 min
264
घडायचे ते घडूनी गेले,
अजाणत्या वयाने इशारले
नजरेने नजरेचे सौदे झाले,
हळव्या स्पर्शाने मन बावरले,
नकळत सारे घडून गेले !!१ !!
सोबत जगणे श्वास झाले,
सहवास तयाचा ध्यास झाले,
अधरांनी अलवार देह चुंबीले,
देह देही एकरुप झाले,
नकळत सारे घडून गेले !!२!!
आणा-भाका, शपथा दिधले
अखंड प्रेमाला वरिले,
प्रेमळ शब्दांना भुलले
हळव्या शृंगारा फसले,
दाखले प्रेमाचे दिधले,
नकळत सारे घडून गेले !!३!!
नव नवतीचे दिन सरले
अबोध प्रेमाचे चोचले,
आता थिल्लर झाले,
प्रेमाचे हे तळे आटले,
नकळत सारे घडून गेले !!४!!
