निसर्गाचे गीत
निसर्गाचे गीत


निसर्गाचे गीत कधीच न कधीच न संपणार
स्वरांची ही देण कधीच न थांबणार
हसत आहेत पानांवर विसावलेले दवबिंदू
गात वाहता या निरभ्र सप्तसिंधू
निसर्गाचा आवाज गुंजतो कानोकानी
आकाशात दिसता सप्तरंगांच्या कमानी
निसर्ग नारखून पाहण्याचा टिटवीचा छंद
फुलांतून वेचायचे फुलपाखरांना मकरंद
कसा वर्णावा मोराचा सुंदर वर्ण
स्पर्श हवासा, दवबिंदूंनी सजलेले पर्ण
निसर्गाचे गीत कधीच न कधीच न संपणार
स्वरांची ही देण कधीच न थांबणार
गीत गात विहग आनंदी उडता स्वछंद
पाखरे शोधतात गवतात दडलेला आनंद
चंद्रप्रकाशात धवल सुरांची देण देई चंद्रकोर
तारकांचे स्वर पिऊन जगणारा चकोर
तारांगणाच्या दिव्याला सुंदर नक्षत्रांची वात
निसर्गाला कोकिळेच्या मधुर गीताची साथ
सुरांनी जोडली एक अतुट तार
वाहे निसर्गात दडलेले आनंद अपार
निसर्गाचे गीत कधीच न कधीच न संपणार
स्वरांची ही देण कधीच न थांबणार