निसर्गाचा नजराना
निसर्गाचा नजराना
1 min
14.3K
कोवळी पहाट ,समोर निसर्गाचा नजराणा
पहाटेचा निसर्ग ,असाच सुंदर देखना
पसरले दूरवर डोंगर विशाल
त्याची काया
निळे सावळे आकाश देई
धरतीला शीतल छाया
पसरली वृक्ष अनेक
हिरवळ दाटे चोहीकडे
विस्तीर्ण हिरवेगार गालिचे
गाई निसर्गाचे गोडवे
वाहे मंद गार वारा
घे तू श्वास नवा
प्रतिदिन पहाट घे
निसर्गाचा नजराणा
