निसर्ग सौंदर्य
निसर्ग सौंदर्य
1 min
351
अभ्या डोंगरांच्या रांगा,
झाडे उभे सारे थाट।
हिरवाई नटलेले,
झाडीझुडपांच बेट॥१॥
डोंगराच्या पायाशीच,
नागमोडी गाडीवाट।
वाट चालता चालता,
पुढे चढणीला घाट॥२॥
हिरवाई नटलेली,
वृक्षवली घनदाट।
असा निसर्ग सौदर्य,
तेथे पक्षांचा गोंगाट॥३॥
कपारीच पान्हावल्या,
पाझरती कडीकाठ।
सप्तरंगी इंद्रधनु,
डोळ्या देखावा आफाट॥४॥
