STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

निसर्ग कवी...

निसर्ग कवी...

1 min
356

सारे सुने सुने झाले

रानकवी हरपला

त्याचा कविता प्रवास 

अचानक हा थांबला 


होते निसर्गाचे वेड

सदा रानात रमला

केले गारुड मनात 

जीव निसर्गा लावला


बाज मराठी भाषेचा

ज्याने अंतरी जपला

जरी कवी साधाभोळा 

हात काळजा घातला


शब्द हिरव्या बोलीचा

साधीसुधी बोलीभाषा 

मातीतुनी उगवली

गवसणी ती आकाशा


चिंब पावसात जेव्हा 

रान केलं आबादानी 

दान नभाचे भुईला

अशी रचलीत गाणी


घन ओथंबुनी येती 

चिंब भिजवती बोल

शब्द हिरव्या बोलीचा 

त्याला धरित्रीची ओल


ऐसे ना. धों. महानोर

ज्यांना ओढ निसर्गाची 

हिरवीकंचशी गाणी 

सांगा कशी जन्मायाची? 


Rate this content
Log in