STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

निसर्ग की चित्रकार !

निसर्ग की चित्रकार !

1 min
209

नाही कुंचला नाही रंगपेटी

 रंग भरतो आपल्या आनंदासाठी 

चित्रकार तो थोर, नाही त्याचा ठाऊक पत्ता

 विश्वावर त्याची खरी आहे सत्ता 

बहाल करतो तो नभाला पहाटे लाल लाली,

रात्री नभ भोर काळे चंदेरी लखलख चांदण्यांची

खडी भासे नभाने घातले पितांबर निळे 

झाडाची पाने हिरवीगार, फुले कशी गुलाबी

पिवळी पांघरुनी फुलांची शाल, धरती भासते नवी नव्हाळी 

आजानुबाहू त्याचे हात, रंगवतो डोंगराचा काळाभोर सुळका 

उभा डोंगर तोर्‍यामध्ये, बघून दरी मारते मुरका 

रंगीबेरंगी बागडणारे फुलपाखरं, पक्षी

हा थोर चित्रकार कसा मनमुराद काढतो नक्षी 

बघून निसर्गाची किमया मना येते उभारी 

या चित्रकाराचे आम्ही लेकरे आहोत आभारी ॥


Rate this content
Log in