निरोप सरत्याला , नव्याच्
निरोप सरत्याला , नव्याच्
1 min
227
कोरोनाचे वर्ष संपले
दुःखामधे जन पोळले
माणूसकी शिकवून गेले
निरोपाचे हात हालले
वाट पाहती नववर्षाची
आशा पालवली मनाला
आरोग्याचा मंत्र भावला
नववर्षाच्या स्वागताला
नव्या आशा आकांक्षा
मनी सा-यांच्या फुलती
नववर्ष आरोग्यदायी
कोरोनाची हकालपट्टी
भिती गायब कोरोनाची
सुखी सारी जनता असो
सर्व काही सुरळीत होवो
देशामधी आलबेल असो
नवीन वर्षी असा भारत
आशादायी स्वप्न जनतेचे
पूर्ण होवो मनोकामना
प्रार्थिते मी परमेशाते
