निर्णय
निर्णय


काही निर्णय आयुष्यात घ्यावेच लागतात,
कधी कधी वाटतं वाट चुकतोय,
पण माणूस स्वतःसाठी तरी कुठे जगतोय
त्या निर्णयातही तो समोरच्याचे भले पाहतोय
निर्णय अगदी तीन अक्षरी शब्द,
चार अक्षराच्या आयुष्यावर त्याचा ताबा ठेवतो,
कधी कधी वाटते देवाने इतके मोठे का केले
लहानपणीच होतो भले,
एका चुकीच्या निर्णयावर सर्व आयुष्य चुकतं...
त्याची किंमत मात्र प्रत्येक नातं मोजतं.....
प्रत्येक नातं मोजतं.....
देवाने दिलेल्या सुंदर आयुष्याचे
आपण असे खेळ मांडतो
आपण असे खेळ मांडतो
आज विचारले मनाला
योग्य आहे काय निर्णय माझा,
मनाने तर कबुली दिली हसत
बुद्धीने मात्र उत्तर दिले नकारात्मक,
निर्णय नसावा एकतर्फी,
निर्णय नसावा एकतर्फी
पण मनाने आणि बुद्धीने करावी एकजुटी,
ही आशा मात्र खोटी...
ही आशा मात्र खोटी...