STORYMIRROR

Shreyash Shingre

Others

2.3  

Shreyash Shingre

Others

नेता कसा असावा ?

नेता कसा असावा ?

1 min
5.3K


नेता असावा ऐसा

जैसा असावा 'शंभू' भोळा

ज्याला राग यावा असत्याचा

प्रसंगी उघडावा तिसरा डोळा


असावी त्याला दूरदृष्टी

जैसा जाणता 'शिवबा' राजा

लोककल्याणाचा ध्यास असावा

आणि असावी सुखी प्रजा


जो घेई वसा स्त्रीशिक्षणाचा

जैसा शोभूनी दिसे 'महात्मा'

त्याचा चीड असावी जातीव्यवस्थेची

शेतकर्‍यांसाठी कळवळे त्याचा आत्मा


त्याच्या अंगी असावी देशभक्ती

त्याला वाराही शिवू नये भ्रष्टाचाराचा

त्याचे चारित्र्य असावे सुंदर निर्मळ

त्यास नसावा माज सत्तेचा


त्याला आदर असावा महिलांप्रती

त्याच्यात पुरुषी अहंकार नसावा

तो असावा लिंगभेदाच्या विरोधी

तो स्त्रीरक्षणासाठी सबळ असावा


त्याची वृत्ती असावी जिंकण्याची

त्याच्या रक्तात भिणावी प्रामाणिकता

त्याला काळजी असावी निसर्गाचीही

त्याने समतोल राखावा पर्यावरणाचा


सैनिकांप्रती त्याला अभिमान असावा

तो असावा चाहता खेळांचाही

कलागुणांना त्याने वावही द्यावा

त्याची नाळ जुडावी संस्कृतीशी


समता,बंधुता मनी नांदावी

असा असावा अमुचा नेता

अभिमान वाटावा देशास सार्‍या

त्याचे नाव मुखी घेता


नेता म्हणजे राजकारणी नाही

हे कळते वेळीच ज्याला

त्यानेच 'मत' मागायला यावे

उगीच करू नये कल्ला



Rate this content
Log in