नदीच्या काठावर....
नदीच्या काठावर....
नदीच्या काठावर गार गार वारे भिरभिरती पाखरे.
किरणांची रांगोळी सळसळतेय पाण्यावर झेप घेती
बगळ्यांची जोडी ताव माश्यांवर.
दाट झाडी पलीकडे किलकीलाट करूनी थवे पोपटाचे.
आकाश मार्गी गमन करीती जात असे जणू मोहिमेवर.
नदीच्या काठावर
मंद वारयाची झुळुक शहारे आणि
ती कोवळी किरण अभिषेक घालुनी वारयास शह देती.
हिरव्यागार दाट वनराईतली,
चिवचिव संथ पाण्याचा स्वर,
पक्षांची गुणगुण मंद नाद वारयाचा मिसळून जाती
एकमेकांत नवा आलाप छेडती.
नदीच्या काठावर प्रतीबिंब रविकराचे पाण्यासह हेलकावे.
पहुडतात थरथर,स्थिर, शांत कधी असती वेगात.
बगळ्यांची एक माळ बसली कधीची उन्ह खात.
नदीच्या काठावर सृष्टी पोसती पक्षी, जलचर,
असंख्य जीव नांदतात आनंदात.
मात्र मनुष्याने केली निसर्गावर मात.
जीवसृष्टीच्या चक्राचा केलाय आपणं घात.