नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं
1 min
462
नातं मैत्रीचं असतं
अगदी रेशीमगाठीसारखं
मृदु मुलायम तरीही
पक्की गाठ बांधल्यासारखं
गाभुळलेल्या चिंचा ,आवळे
कोरडी भेळ नि बोरे
देता घेता एकमेकांना
खूपच मजा वाटे
कधी कधी मैत्रीत
अगदी शपथाही घेतल्या
पण सुटली म्हणून
निश्वासही टाकला
भांडणे लुटुपुटुची
बोलाबोलीही लगेच
सर्व काही विसरुन
गळाभेट लगेच
आजही मैत्रीचं नातं
बहरलेलंच आहे
मेसेज नाही आला
तर फोन हातात आहे
