STORYMIRROR

UMA PATIL

Others Romance

3  

UMA PATIL

Others Romance

नाते

नाते

1 min
10.7K


नाते...

हृदयाचे हृदयाशी

माणसाची माणुसकी जपणारे

तनामनाला शहारे आणणारे


नाते...

भावना जाणणारे

घट्ट विणलेल्या प्रीतीचे

प्रथा, परंपरा आणि रीतीचे


नाते...

मनाशी मनाचे

एकमेकांच्या प्रेमातील तनाचे

हळूवार भावना जपून ठेवणारे


नाते...

सहवासाने फुलणारे

अखंड असलेल्या भक्तीचे

दैवी चमत्कारीक ईश्वरीय शक्तीचे


नाते...

प्रेमाचा सागर

मायेने भरलेली घागर

तिच्या डोळ्यातील वाहणाऱ्या भावनेचे


नाते...

हळुवार बोल

अंतरीची जखम खोल

अडचणी सोडवणाऱ्या मजबूत कष्टाचे


नाते...

मनाशी संबंध

हृदयातून झरणारा प्रेमबंध

दोन मने जोडणारा पूल


Rate this content
Log in