नाते
नाते
स्वार्थी या जगामध्ये मी
निस्वार्थपणे नाते जपले
कामापुरते गोड बोलून
शेवटी सारे मला सोडून गेले.....
आपले कोण परके कोण
ओळखावे तरी कसे ?
कालांतराने सरड्यासारखे
सगळेच रंग बदलताना दिसे.....
ज्यांच्यावर केला विश्वास
त्यांनीच माझ्या मूर्खपणाला हसे
दुःखाच्या क्षणाला माझ्याजवळ
डोळे पुसायला ही कोणी नसे.....
नाती सगळी तोडून मी
एकटी जगत होती बरी
काही नाती पुन्हा दार ठोकले
आम्ही देऊ तुला साथ खरी.....
भोळे बाबडे मन माझे
झाले ना ते कधी व्यवहारी
परत एकदा मतलबी नाती
केले हृदयावर माझ्या सवारी.....
वेगवेगळ्या नात्यांचे जीवनात
होतं गेले सतत आघात
नात्यातील प्रतिघाताने खूप काही
शिकायला मिळाले मला जगात......
