नाते बंध ( अभंग रचना )
नाते बंध ( अभंग रचना )
1 min
447
नाते बंध
( अभंग रचना )
आदिवासी आम्ही | संस्कृतीही तीच I
परंपरा हीच | जपलेली ॥ १ ॥
मातृसत्ताक हो I मातेचे पुजन |
तिचेच वचन I सर्वश्रेष्ठ ॥ २ ॥
रानटी अवस्था | दिलीय टाकून I
आणिक शिकून | सावरलो ॥ ३ ॥
आजचा माणूस I झालाय प्रगत |
गेला विसरत I माणूसकी ॥ ४ ॥
अवकाशात हो | आज जरी गेला I
कसे निसरला I नाते बंध ॥ ५ ॥
किशोर झोटे,
औरंगाबाद
