STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

नात मैत्रीचं ।।आपली माणसं।।

नात मैत्रीचं ।।आपली माणसं।।

1 min
366

आपलीच माणसे असं म्हणून, रोज आपल्यातच बसायचं|

देश प्रजासत्ताक झाला तरी, आपण वेगळं का जगायचं||धृ|| 


देश प्रेम सोडून आता जाती-धर्मासाठी का लढाईच|

अन देवा-दिकासारखं, आपल्या लिडरला का जपायचं||


हेच करायच होत तर, स्वातंत्र्य कशाला मागायचं|

अन मग देशप्रेमासाठी लोकांनी उगाच का मरायचं||१||


मुस्लिमांच कुरण, ख्रिचनाच बायबल, हे जर होत करायचं|

अन रामायण सोडून, महाभारतासारखं रोज का लढाईच||


म्हणून म्हणतो जात-पात, देव धर्म घरातल्या घरात जपायच|

अन माणसानं माणूस म्हणून, आता माणसासारखं वागायचं||२|| 


राम-रहीम नानक-साई, येशू, महावीर, बुद्ध हे देव सारे एकच|

अन यावरून रोज हणा-माऱ्या करीत, दंगली करीत का हिंडायच||


सोडून द्या असले उधोग-धंदे, आणि आता करा फक्त एकच|

जात देव-धर्मासाठी गल्ली मोहल्ल्यात, वेग-वेगळ नाही बसायचं||३||


सारांश-आपलं घर असो की गाव, नाही तर देश असो त्यात राहणारी वावरणारी माणसं सर्व एक आहेत मग भेदभाव का घरातही भांडण होता ना? मग वैर का? देशबद्दल ही प्रेमाच नात असाव म्हणून ही कविता..


Rate this content
Log in