नाजुक क्षण
नाजुक क्षण
1 min
367
मंद वार्याची आली झुळुक
श्वासात घेत होतो भरुन
त्या क्षणी तु दिसलीस समोरुन
गौरवर्ण तुझा, हनुवटीवर हलका तीळ
बेभान होउनी मी घातली गोड शीळ
दूर सावरल्या तू बटा
ओठांवर चढली लाली
गोबर्या गालावर दिसली खळी
मनमोहक रुप तुझे, नकळत पडलो प्रेमात
रातराणीच्या सुगंधाने सगळे झाले बेहाल
दरवळणारा हा गंध ठेवायचा जपून
भेटशील का ग तू रोज नव्याने लपून लपून
