STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

नागपंचमी

नागपंचमी

1 min
35


हाती भरुनी हिरवा चुडा

चेहऱ्यावरती नवी नव्हाळी 

तळवा रंगला मेहंदी ने

नागपंचमीला आली बाळी


सळसळता चंदेरी काठ

ल्याली नथ पाटल्या गोठ

गेली पूजा या वारुळाला

नाग रुपी भाऊरायाला


पंचमीचे फेर धरुनी

खेळू लागली झिम्मा फुगडी

नाव देता पती देवाचे

लाजून लाल झाली लाडी


कौतुके माय बाप पाहती

मैत्रिणीही चेष्टा करती

लाजुनी सांगे सर्वांना ती

त्यांची प्रीती बहु मजवरती


दिवसामागून दिवस चालले

वर्षामागून वर्षे सरली

ज्यांच्यासाठी ओढ माहेरची

ती माय बापे आता नुरली


आताही येते नागपंचमी

होती फेर झिम्मा गाणी

आठव येता माहेराचा

ओठी हासू नयनी पाणी


Rate this content
Log in