ना समज मानव
ना समज मानव
1 min
171
दरवर्षी वृक्ष संवर्धनाचा संकल्प,
प्रत्येक जण करतोच आहे
प्रत्येक वृक्ष अतिक्रमणात,
घोषीत केले जात आहे ।।
उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न
दरवर्षीच असतो
तरीही प्रत्येकजण पाण्याचा
अपव्यय करतो।।
समज असुनही मानव
नादाना सारखा वागत आहे
स्वार्थी होऊन निसर्गाशी
अघोरी खेळ खेळत आहे।।
नको ते प्रयोग निसर्गावर
होत आहेत
त्याचे वाईट परिणाम
सर्व भोगत आहेत।।
प्रदूषणाची हळहळ
सर्वत्र व्यक्त होते
प्रदूषण नियंत्रण नियमावली
दुर्लक्षित असते।।
पृथ्वीवरील बुध्दीवान प्राण्यांची
बुध्दी हिन होतांना दिसत आहे
प्रत्येक गोष्टीचा अतिरेक
त्याला भोवणार आहे।।
