STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

मुरली मनोहर कान्हा

मुरली मनोहर कान्हा

1 min
318

रूप मनोहर तुझे रे कान्हा

ऐकुनी पावा गाईंना फुटे पान्हा....


सवंगड्यासह मस्ती करीसी

गोपिकांचे मटकी फोडीसी....


देवकीचा तू लाडका बाळ

परी अससी तू भारीच खट्याळ....


पिता वासुदेव भाऊ बलराम

नाव शोभे तव घनश्याम....


राधेचा तू मुरलीमनोहर

राधा कृष्ण झाले अमर....


मीरे चा तू श्याम सुंदर

एकच नाव ती जपे निरंतर....


रूप मनोहर तुझे रे कान्हा

ऐकुनी पावा गाईंना फुटे पान्हा....



Rate this content
Log in