मुलगी झाली हो
मुलगी झाली हो
1 min
355
मुलगी झाली हो
मुलगी..
घरात करा रोषणाई
इवल्याशा पावलांनी
दारी सजली नवलाई
गोंडस गोजिरी चिमुकली
रूप तिचे साजिरे
नाजूक तिचा स्पर्श होता
मन हे गहिवरे
फुलला अंगणी बाग फुलांनी
नटली धरणी स्वागता
तुझ्या येण्याचा आनंद
ओसंडतोय न सांगता
