STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

मसाला डोसा...!

मसाला डोसा...!

1 min
4.4K


मसाला डोसा.....!!

सकाळची न्याहरी

घ्यावी यरवाळी

म्हणावे हरी

चाखता मस्त करी


डोश्याची लज्जत

वाढवते इज्जत

घालू नये हुज्जत

चटणी साठी


भाजीचा आस्वाद

नको बटाटा वाद

ही चांगली खाद

पोट पूजना घाली साद


पोट भरून खावे

कौतुक तोंडभरून करावे

रोख दाम मोजावे

चहा घेता घेता


असा हा दिनक्रम

परिपाठा समान

पाळावा नित्य

सदृढ तब्येतीसाठी


होईल प्रसन्न

धनवन्तरी आपोआप

आरोग्य संपन्न

जीवन प्रदान करण्यास


एक अट मात्र

खूण गाठी समान

शुचिर्भूत होऊन

प्रसाद हा घ्यावा नित्य नियमाने


जेणे समाधान अन

आरोग्य सम्पन्न जीवन

लाभेल निश्चित

सदृढ धन्वंतरी समान....!


Rate this content
Log in