मृत्यूच दारात (सहाक्षरी)
मृत्यूच दारात (सहाक्षरी)
1 min
191
व्यसन जडण्या
वाईट संगत
चांगले सोडतो
जगतो नशेत.....१
आग्रह करती
लावती ती लत
हेच वय आहे
जगावे धुंदीत.....२
एका झुरक्याने
नाही काही होत
ओढतो सिगार
खोकत खोकत....३
झिणझिणी उठी
अशा त्या डोक्यात
धूर कोंडमारा
नाकाने सोडत....४
हा चेन स्मोकर
घडे नकळत
कॅन्सर जडतो
मृत्यूच दारात.....५
