मृगजळ
मृगजळ


उरल्या श्वासाची मंद चाहुल
संपण्या स्वप्नांची नव्याने ओळख
आतुर मन न मर्जित वागे आज
आशेत भुलले कसे मृगजळास
ऊरला भाव अश्रु न नजरेत
कोरले चित्र कोरड असे मनात
अदृश्य पट मांडला असे भावनेत
विरण्यास जीव आतुर आगतिक भासे
कोवळ्या कांती ची पहाट एक
रविच्या आगमनाने दिपली असे
दु:खरी सल बोचते पुन्हा एक
भासती हसरी किरणे मृगजळासम
झेलली ती तृष्
णा अस्तिवाची एक
ओळख अजुनी बाकी असे जीवनात
अर्ध्यावर्ती पुसली जाणार नाहीत
असे अनेक अर्थ आहेत जीवनात
भुलवने नको ते मृगजळ च एक
वरवरचे सुख क्षणिक आनंदाचे
नको कोणा उरी अगळीक नात ते
नको अनामिक हुरहुर मनी ती
विरण्यास सज्ज आज स्वप्न एक
अंतरंगी ची सरली धुक्याची चादर
हरली ती हसरी पहाट आज
विसरली नजरेत तयाच्या तिचा गाव..
मृगजळच ते भुलवे स्वप्न साकार मनीचे