STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Others

3  

Prof. Shalini Sahare

Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
237

भेगाळलेली, वाफाळलेली, तृष्णार्त झाली ही धरती

चातकाची अगम्य तृष्णा, पशु पक्षी प्राणी सारे

सारेच कसे तहानलेली, धरणी ही कासावीस झाली

मेघराज आले धरणीवरती, स्वप्नांची दुलई घेऊन 

अहाहा ! अहाहा ! अहाहा ! अहाहा ! अहाहा !


चराचर सृष्टी पाणावली, ऊन सावळ्यांचा खेळ

नभी इंद्रधनू फुलली, बागडणारी जनावरे, अन 

गाई गोठ्यात हंभरली, पाने फुले बहरली 

आतुरलेली अभिसारिका, प्रियाच्या मिठीत विसावली.

मृदगंधाने बहरली, अहाहा ! अहाहा ! अहाहा !


धरती नटली सजली शृंगारली, रोमा रोमाने पुलकित झाली

मृदगंध दरवळला चोहीकडे, सारी अत्तरे खुजी ठरली

सुगंधी मातीचा परिमळ दरवळला, बघा बघा 

मोर थुईथुई नाचू लागले रानीवनी.

मृदंगंधाने बहरली, अहाहा ! अहाहा!


धरती ही गर्भारली, हिरवा शालू लेवून नटली

नद्या नाले खळखळून लागली,ओढे ओहोळ वाहू लागले

प्राणी पक्षी गाऊ लागले पृथ्वीचे नंदनवन झाले

पावसाचा गारवा, तनामनात झिरपला,आषाढ गाणे गाऊ लागला,

सुरेल गळ्याने तान घेतली, मेघ मल्हार बरसु लागला,

मृदगंधाने बहरला.अहाहा ! अहाहा ! अहाहा ! अहाहा!


सृष्टीने जणू कात टाकली, नव्याने धरणी फुलू लागली

धन धान्याची पेरणी झाली,बळी राजाची स्वप्ने फुलली

संक्रान्त आली, लोहरी गीत गाती झाली

मृदगंध पावसाचा आसमन्तात दरवळला

दाही दिशा सुगंधित झाल्या. नवं यौवना प्रणयांकित झाल्या,

रोम रोम चेतवला, शृंगार असा पेटवला, तनमनात भिनला,

सुगंध असा दरवळला,मृदगंधाचा हा महिमा जणू परिसस्पर्श झाला.

अहाहा ! अहाहा ! अहाहा ! अहाहा ! अहाहा ! अहाहा!

मृदगंधाने असा आसमंत बहरला ,अहाहा ! अहाहा ! अहाहा ! 


Rate this content
Log in