STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

4  

Samiksha Jamkhedkar

Others

मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिन

1 min
313

माझ्या मराठी भाषेची

काय गाऊ मी थोरवी

शब्द तिचे गोड मधुर

सूंदर जात्यावरची ओवी।


ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी

तुकोबांनी रचली गाथा

आमची सुंदर मराठी राजभाषा

चरणी ठेवितो मी तिच्या माथा।


साहित्य क्षेत्रात मराठीच्या

कविता ऐकण्या वाटे सुमधुर

मायबोली म्हणतो तिला अन

लिहितांना दाटून येतो ऊर।


कवी कुसुमाग्रजांचा आज 

साजरा करू जन्मदिन

वंदन करून त्याच्या कवितांना

साजरा मराठी राजभाषा दिन।


Rate this content
Log in