मराठी भाषा
मराठी भाषा
1 min
235
माझ्या मराठी भाषेचा
काय वर्णू मी महिमा
तिच्या शब्दात आहे
लाजाळूच्या संवेदना--१
मी वाचते मराठी,
बोलते मातृभाषा मराठी
माय , माऊली माझी
गे मायभू मराठी---२
भारूड,अभंग, गाथा , कविता
लिहील्या कवींनी मराठीत
किती त्यांचे कौतुक, पुरस्कार
सुंदर अर्थपूर्ण आहे भावगीत-३
आमच्या मराठी भाषेचा
आहे आम्हास आदर
लिहितो मनोभावे मराठीत
तेच करतो आनंदाने सादर-4
