मोरी/मोळी
मोरी/मोळी

1 min

11.8K
पहाटेला उजाडता
पोटाचीच भ्रांत सारी
जंगलाला धाव घेते
पकडून हाती दोरी
जाऊनि कधी दूरवर
शोधती कुरूप मोठा
तोडून घेती त्यांतुन
काठयांचा आकार छोटा
जमा करूनि काठ्या
दोऱ्यावर छान रेचती
सरळ मांडून काठ्या
त्यात दोरी पक्की कसती
उचलून डोक्यावर
वजनदार ती मोळी
धाव घेत चालतात
रस्त्याच्या त्या कडी
मानेला कधी त्यांचा
आला थकवा भारी
तेव्हाच ते उभा करी
मोळी रस्त्याच्या पायी