मोक्ष
मोक्ष
1 min
2.5K
वर्षभर उपेक्षित असतोस
पोटासाठी इथे तिथे
चोंच मारीत असतोस
वर्षात एकदा तरी
चांगले खाण्यास मिळावे तुला
म्हणूनच तर हा दिवस असतो
इतरांनाही मिळते समाधान
आयुष्यभर दुर्लक्षित केलेल्या पितरांना
चांगले खायाला देऊन
त्यांच्या नाहीतर स्वतःच्या
स्वर्गात जाण्याची तयारी करण्यासाठी
कारण कावळा होऊन
त्यांना नसते हिंडायचे
ह्या उकिरड्यावरुन त्या उकिरड्यावर
पितर आमावस्येची वाट पहात
