STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

मोगरा

मोगरा

1 min
318

शुभ्र धवल मोगरा पाहा फुलला

सुवास आसमंती मस्त दरवळला....


नाजूक लहान हीशुभ्र फुले छान

आवडती सर्वां मोठ्या नि सान...


चांदणे जसे वृक्षांवर फुले शोभती

नारी व मुली गजरा याचा माळती...


मोगर्‍याचा गजरा सजणीला देती

सजणी गजरा केसात सजविती...


चैत्री नवरातीला गजरा मोगर्‍याचा

साज बनतो गजरा देवीदेवतांचा...,


नारीने मोगर्‍याचा घातला गजरा

नरांच्या वळून वळून पाहती नजरा...


दारात मोगरा बाई देखणा फुलला

पक्षांसवे पिलांचा झुलाही झुलला....


Rate this content
Log in