Mogara
Mogara
1 min
140
हिरव्या गर्द पाना आड शुभ्र चंद्र उमलला.
कितीएक रात्री तू माझ्या स्वप्नात बहरला.
उमललेल्या पाकळी पकळीतून स्वर्गच खुलले.
वेचता वेचता तुला मन माझे मोहरले.
धुंद तुझ्या सुगंधाने मी ही शहारले.
तुझ्या बहरलेल्या झाडाला मी कल्पवृक्षच मानले.