मनमोहिनी
मनमोहिनी
1 min
184
स्वप्नवत घडले सारे
मनी काही नसताना
अबोल प्रियाची प्रीत
मजवर असताना..
समजले ना मला
उमजेना ना त्याला
काय करावे कळेना
प्रीतीत बांध आला.....
भेटलो निवांत क्षणी
नयनातून पाहत राहिलो
सखा तर हरवून गेला
प्रीतीतच आम्ही रमलो...
मनमोहिनी म्हणून मला
जवळ त्याने खेचले
पाश सारे गळून पडले
प्रीतीचे रंग आम्ही वेचले..
