मनीमाऊ
मनीमाऊ
1 min
275
गंमत झाली रे बाबा गंमत झाली रे
आईबरोबर आमच्या घरात माऊ आली रे.....
शेपटी हलवत पांढरी मनीमाउ आली
आल्या आल्या आजीला चाटायला लागली....
आजीने माऊला मायेनं छान गोंजारले
माऊला बशीभर थंडगार दूध दिले ....
माऊ लागली जिभल्या चाटायला
दूधावर मग माऊने तावच मारला....
दूध पिऊन तृप्त आणि शांत झाली
मनीमाऊ आमच्या घरतच राहिली....
