मनातल्या गोष्टी
मनातल्या गोष्टी




आज अचानक भेटला तो पुन्हा
म्हणाला ओळखलस का ग मला?
सरलेल्या या सालांमध्ये
आठवलेस का कधी मला?
गालात हसत ती म्हणाली
अरे वेड्या विसरले होते कधी तूला
काळ जरी सरला इतका
मनाच्या कुपीत जतन केल होतं तुला
तोही मग गालातच हसला
नदीच्या काठावर अलगद बसला
बोलला तिला पाहून
का ठेवलस ग आठवणीत मला
परत भेटू अस वाटल का तूला?
तीही सावरून बसली सोबत
अन म्हणाली अरे अस कुठे असत का
मनातल्या गोष्टी विसरत नाहीत
मनातून बाहेर काढल्या
तरी त्या पसरत नाहीत
तो पाहतच राहिला तिला
विचारांचा दागिनाच जणू
मिळाला होता तिला