मनातल्या गाठी
मनातल्या गाठी

1 min

3.1K
मनातल्या
गाठी असतात थोड्याशा ओल्या
सोडवल्या तर सुटतात
नाही डबल मारल्या तर
विळखाच बसतो
मनातल्या
गाठी असतात थोड्याशा विस्कटलेल्या
विळखाच बसतात
विळखा असला तर घट्ट
आवळून टाकतात
मनातल्या
गाठी असतात थोड्याशा बेधुंद
बाहेर यायचे पाश पक्के
तर अलगद विळखा सोडवतात
सोडल्यावर उरतो तो असतो,
फक्त अनाहूत गुंता, ती सोडवायची चिंता