मनातली कविता
मनातली कविता
1 min
453
मनातल्या कोपऱ्याने
उघडले दार कवितेसाठी
सुख - दु:खाच्या गोष्टी
कवितेत माडण्यांसाठी
मुक्या भावनांच्या वेदना
कवितेतून सांगण्यासाठी
कवितेचा प्रवास असाच
राहावा जगण्यासाठी
कविता शोधण्यासाठी
पालथे केले रान सारे
गोदावरीच्या काठावर
शब्द शब्द शोधत फिरे
शब्दांची उजळणी करुन
लिहली सखीने कविता
आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी
मांडते कागदावर सरिता
लेखणीतून उमटले सारे
मनात वावरणारे शब्द
सखीचे दुःख पाहून
कविता झाली निशब्द
निशब्द अशा भावनांनी
कविता रडली लेखणीतून
हृदयातल्या वेदनांना उमटवून
आधार मिळाला कवितेतून
शेवटचा श्वास आता कवितेसाठी
आयुष्याचे सुख-दुःख माडण्यांसाठी
